पुणे – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी पीसीएमसी-स्वारगेट कॉरिडॉर मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या कामाची पाहणी केली. यावेळी शरद पवार मेट्रो रेल्वेच्या ट्रायल रनमध्ये फुगेवाडी ते संत तुकाराम नगर मेट्रो स्टेशनपर्यंत प्रवास केला.
फुगेवाडी मेट्रो स्टेशनवरील मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी शरद पवारांना स्टेशनवरील विविध वैशिष्ट्यांची माहिती दिली. शरद पवार यांनी जवळपास दीड तास थांबून मेट्रो प्रकल्पाविषयी सर्व माहिती घेतली.
पुणेकरांचा प्रवास अधिक सुखकर आणि जलद करण्यासाठी मेट्रो लवकरात लवकर प्रवाशांच्या सेवेत रुजू होईल, असा विश्वास यावेळी शरद पवार यांनी व्यक्त केला आहे.