विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीकडून दोन नावांची घोषणा, एकनाथ खडसेंच राजकीय पुनर्वसन होणार

WhatsApp Group

राज्यसभेच्या निवडणुकांची धाकधुकी सुरू असतानाच विधान परिषदेच्या निवडणुकाही लागल्या आहेत. येत्या २० जून रोजी विधान परिषदेच्या निवडणुका होतील. दरम्यान, भाजपने विधान परिषदेसाठी उमेदवार जाहीर केल्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसनेही दोन उमेदवार जाहीर केले आहेत. या यादीत एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्यासोबत रामराजे निंबाळकर यांना देखील राष्ट्रवादीने संधी दिली आहे. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी ट्विट करत ही माहिती दिली.

राज्यात येत्या 20 जून रोजी विधान परिषदेची निवडणूक होणार आहे. याकरिता आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने उमेदवारांची यादी जाहीर केली असून, एकनाथ खडसे आणि राम राजे निंबाळकर यांना संधी देण्यात आली आहे. आज एकनाथ खडसे आणि रामराजे निंबाळकर राष्ट्रवादीकडून अर्ज भरतील.

विधान परिषदेचा अर्ज भरण्यासाच्या शेवटच्या दिवसापर्यंत राष्ट्रवादीकडून उमेदवाराची यादी जाहीर करण्यात आली नव्हती. त्यामुळे एकनाथ खडसे यांना गॅसवरच ठेवलंय का? अशी चर्चा सुद्धा रंगली होती. मात्र अखेर या चर्चेला पूर्णविराम लागला आहे.