‘एनसीसी’ प्रशिक्षण घेऊन प्रमाणपत्र धारण केलेल्या आणि पोलिस भरती होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाना यापुढे एनसीसी प्रमाणपत्राचे गुण ग्राह्य धरणार असल्यानं ‘एनसीसी’ कॅडेट्सना नवा आशेचा किरण निर्माण झाला आहे.
या संदर्भातले महाराष्ट्र शासनाकडून राजपत्र प्रसिद्ध करण्यात आहे. महाराष्ट्र पोलिस दलामद्धे पोलिस शिपाई होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचं पोलिस भरतीसाठी गावोगावी रानामाळात मुलं घाम गाळत असताना दिसतात. सुधारित निर्णयामुळे एनसीसी प्रमाणपत्र प्राप्त कॅडेट्च्या पंखांना आता अधिक बळ मिळणार आहे.
राष्ट्रीय छत्रसेना (एनसीसी)चे ”क”(सी) प्रमाणपत्र असणाऱ्यास परीक्षेच्या एकूण गुणांच्या ५%, एनसीसीचे ”ब”(बी) प्रमाणपत्र असणाऱ्यास परीक्षेच्या एकूण गुणांच्या ३% तर एनसीसीचे ”अ”(ए) प्रमाणपत्र असणाऱ्यास परीक्षेच्या एकूण गुणाच्या २% अधिकचे बोनस गुण अंतिम निवडीवेळी ग्राह्य धरले जाणार आहेत. कोल्हापूर विभागातील कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी व सिंधुदुर्ग येथे एनसीसीचे विविध विभाग कार्यरत आहेत.