क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणाचा तपास करणारे एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे हे गेल्या वर्षभरापासून ड्रग्जविरोधात मोहीम राबवत आहेत. समीर यांच्या कडक स्वभावामुळे अनेक बॉलिवूड अभिनेते आणि अभिनेत्री यांनी तर त्यांचे व्हॉट्सअॅप चॅट्सही कायमचे डिलीट केले आहेत. मी बॉलिवूडच्या विरोधात नाही, असे समीर यांनी यापूर्वी स्पष्ट केलं आहे, मात्र जे कायदा मोडतील त्यांच्या विरोधात मी नक्कीच कार्यवाही करेन मग ते कोणीही असो!
समीर वानखेडेंच्या नावामुळे बॉलीवूड इंडस्ट्री थरथर कापते कारण त्यांनी वेगवेगळ्या पदांवर काम करताना बॉलिवूड सेलिब्रिटींना लक्ष्य केले आहे. सर्व्हिस टॅक्स ऑफिसर, कस्टम विभाग आणि एनसीबीचे झोनल चीफ म्हणून काम करताना त्यांनी बॉलीवूड स्टार्सवर कडक कारवाई केली. यामध्ये अनेक दिग्गज अभिनेत्रींचा समावेश आहे. आज पाहूयात अशाच काही घटना…
आर्यन खानच्या चॅटमध्ये नाव आल्यावर अनन्या पांडेची चौकशी
शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या अटकेनंतर त्याच्या संपर्कात असलेले अनेक स्टार किड्सची एनसीबीने चौकशी केली आहे. चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडेचीही अनेक वेळा चौकशी करण्यात आली आहे. समीर वानखेडे यांनी अनन्या पांडेला चौकशीसाठी उशिरा पोहोचल्याबद्दल खडसावत हे तुझं प्रॉडक्शन हाऊस नसून सरकारी कार्यालय आहे, असे कठोर शब्दात समज दिला होता.
आर्यन खानच्या संपर्कात राहणार्या एका मोठ्या निर्मात्याची मुलगी, एका अभिनेत्याचा भाचा, मोठ्या अभिनेत्याची मुलगी आणि बड्या अभिनेत्रीची बहीण देखील NCB च्या रडारवर आहे.
अनुष्का शर्माला 11 तास विमानतळावर ठेवलं होत थांबवून
सीमाशुल्क विभागात कार्यरत असताना समीर वानखेडे यांनी 2011 मध्ये अनुष्का शर्माला मुंबई विमानतळावर थांबवले होते, जिथे तिची झडती घेण्यात आली होती. डायमंड ब्रेसलेट, नेकलेस, अंगठ्या, महागड्या घड्याळांसह इतर मौल्यवान वस्तूंमुळे अनुष्काला विमानतळावर थांबवण्यात आले होते. तीला सुमारे 11 तास विमानतळावर थांबावे लागले होते. बराच काळ अनुष्काची चौकशी केल्यानंतरच तीला विमानतळाबाहेर जाण्याची परवानगी देण्यात आली होती.
कतरिना कैफला विमानतळावर ठोठावला होता दंड
कतरिना कैफसारखी दिग्गज अभिनेत्रीही समीर वानखेडे यांच्या नजरेतून सुटली नाही. 2012 मध्ये समीर यांनी परकीय चलन नियमन कायद्याअंतर्गत कतरिनाला 12 हजार रुपयांचा दंड ठोठावला होता.
मिनिषा लांबाची विमानतळावर तब्बल 16 तास झाली चौकशी
समीर वानखेडे यांनी काही वर्षे मुंबई विमानतळावर कस्टम अधिकारी म्हणून काम केले होते. यादरम्यान अनेक अभिनेते-अभिनेत्री त्यांच्या निशाण्यावर आलेत. त्यात मिनिषा लांबाच्या नावाचाही समावेश आहे. सीमाशुल्क विभागाचे सहायक आयुक्त असताना समीर वानखेडे यांच्या पथकाने त्यांना पकडले होते. यावेळी मिनिषा लांबाच्या बॅगेतून हिऱ्यांचे दागिने आणि काही मौल्यवान वस्तू सापडल्या होत्या, ज्याची किंमत 50 लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले होते. या संदर्भात मिनिषा लांबाची 16 तास चौकशी करण्यात आली होती.
बिपाशा बसूलाही भरावा लागला होता दंड
अभिनेत्री बिपाशा बसूही समीर वानखेडेच्या नजरेतून सुटू शकली नाही. समीर वानखेडे यांच्या पथकाने त्यांना मुंबई विमानतळावर अडवले. खरं तर, बिपाशा बसू तिच्यासोबत काही वस्तू घेऊन गेली होती, ज्यांची किंमत 60 लाख रुपये होती.