मुंबई – अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर चर्चेत आलेले ड्रग्जचे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर समोर आलेल्या या प्रकरणात अनेकांना अटक करण्यात आली होती. एवढेच नाही तर हे प्रकरण समोर आल्यानंतर बॉलिवूडचे ड्रग्ज कनेक्शन्सही समोर आले होते.
सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर हे प्रकरण थंडावले असले तरी आता पुन्हा एकदा ड्रग्जचे प्रकरण चर्चेत आले आहे. मिळालेल्या माहितीनूसार सुशांत सिंह राजपूतच्या शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ने अटक केली आहे.
गेल्या 8 महिन्यांपासून फरार असलेला सुशांत सिंग राजपूतचा शेजारी असलेल्या ड्रग्ज तस्कर शाह इलियास फ्लाको याला एनसीबीने अखेर अटक केली आहे NCB has arrested Sahil Shah alias Flacko .
NCB has arrested Sahil Shah alias Flacko in connection with a drug case. Flacko, neighbour of actor Sushant Singh Rajput, was on the run for the last nine months, says the intelligence agency
— ANI (@ANI) January 28, 2022
एनसीबीच्या म्हणण्यानुसार, गेल्या वर्षी एप्रिलमध्ये अटक करण्यात आलेल्या आरोपी गणेश शेरे आणि सिद्धांत अमीन यांच्याकडून 25 लाख रुपये किमतीचा 310 ग्रॅम गांजा आणि 1.5 लाख रुपये जप्त केल्याप्रकरणी ते फ्लाकोची चौकशी करणार आहे.
गेल्या वर्षी अटक करण्यात आलेल्या गणेश शेरेने एनसीबीच्या अधिकाऱ्यांना फ्लाकोबाबत माहिती दिली होती. त्यानंतर मालाड येथील त्याच्या फ्लॅटवर छापाही टाकला होता. फ्लाकोने बुधवारी उशिरा एजन्सीसमोर हजर झालेल्या आत्मसमर्पण केले. तो आपल्या पत्नीसोबत दुबईत होता आणि नुकताच भारतात परतला आहे.