मुंबई – राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक Nawab Malik यांची प्रकृती बिघडली असून त्यांना उपचारासाठी मुंबईतील जे जे रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सुरुवातीला नवाब मलिक यांना वैद्यकीय चाचणीसाठी रुग्णालयामध्ये आणले आहे मात्र, आता नुकत्याच समोर आलेल्या वृत्तानुसार, मंत्री नवाब मलिक यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Maharashtra Minister and NCP leader Nawab Malik admitted to JJ Hospital in Mumbai. Details awaited.
He has been remanded to ED custody till March 3, in connection with Dawood Ibrahim money laundering case.
(File photo) pic.twitter.com/NSGxiosJhM
— ANI (@ANI) February 25, 2022
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, नवाब मलिक यांना पोटदुखीचा त्रास जाणवत असल्यामुळे त्यांना उपचारासाठी मुंबईतील जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक NCP leader Nawab Malik यांना बुधवारी दाऊद इब्राहिम मनी लाँडिरग प्रकरणात नवाब मलिक यांना स्पेशल पीएमएलए कोर्टाने Special PMLA court 3 मार्चपर्यंत ईडी कोठडी ठोठावली आहे.
वाचा : मुंबई मनी लॉन्ड्रिंग प्रकरण; नवाब मालिकांनंतर आता शिवसेनाचा नेता ईडीच्या रडारवर