मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक Nawab Malik यांना अंमलबजावणी संचालनालयाने अटक केल्यानंतर महाविकास आघाडीचे मंत्री उद्या महात्मा गांधी स्मारक येथे अंमलबजावणी संचालनालय आणि केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने करणार आहेत. अशी माहिती छगन भुजबळ Chhagan Bhujbal यांनी पत्रकारांना दिली आहे.
छगन भुजबळ यांनी पुढे बोलताना सांगितले की, ‘शरद पवार यांना ममता बॅनर्जी आणि काँग्रेस नेत्यांचे फोन आले असून त्यांना आम्हाला पाठिंबा दर्शवला आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते आणि महाराष्ट्राचे मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बैठकीनंतर त्यांनी ही माहिती दिली आहे.
Nawab Malik was arrested in the wrong manner. He is being punished for attacking the Opposition. We will fight for justice. They (Centre) are putting pressure on our ministers in order to collapse our govt: NCP leader and Maharashtra minister Chhagan Bhujbal pic.twitter.com/YhEC71cpWr
— ANI (@ANI) February 23, 2022
नवाब मलिक यांना चुकीच्या पद्धतीने अटक करण्यात आली. विरोधकांवर हल्लाबोल केल्याने त्यांना शिक्षा होत आहे. आम्ही न्यायासाठी लढू. आमचे सरकार पाडण्यासाठी केंद्र सरकार आमच्या मंत्र्यांवर दबाव आणत आहेत, असही छगन भुजबळ म्हणाले.