नवाब मलिकांच्या अडचणीत वाढ : कोर्टाने 7 मार्चपर्यंत वाढवली ईडी कोठडी

WhatsApp Group

मुंबई – महाराष्ट्र सरकारचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक Nawab Malik  यांच्या अडचणी वाढत आहेत. विशेष पीएमएलए न्यायालयाने नवाब मलिक यांना७ मार्चपर्यंत ईडी कोठडीत पाठवण्याचे आदेश दिले आहेत. यापूर्वी त्यांना ३ मार्चपर्यंत कोठडी सुनावण्यात आली होती. त्याची मुदत गुरुवारी संपत होती. नवाब मलिक यांच्यावर दाऊद इब्राहिम मनी लाँड्रिंग प्रकरणाशी संबंध असल्याचा आरोप आहे.

महाराष्ट्र सरकारचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना मनी लाँडिरग प्रतिबंधक कायदा, २००२ (पीएमएलए) अंतर्गत गेल्या महिन्यात अंमलबजावणी संचलनालयाकडून अटक करण्यात आली होती. २३ फेब्रुवारीला दाऊद इब्राहिम मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केल्यानंतर नवाब मलिक यांना यांना ९ दिवसांची ईडी  कोठडी सुनावली होती. जी की आज संपली मात्र आता पुन्हा न्यायालयाने ७ मार्चपर्यंत ईडी कोठडी वाढवल्याने नवाब मलिकांच्या अडचणीत वाढ झाली आहे.