वानखेडे 50 हजारांचा शर्ट आणि 2 लाखाचे शूज घालतात – नवाब मलिक
मुंबई – क्रूझ ड्रग्ज प्रकरणावरून सुरू झालेला नवाब मलिक आणि एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यातील संघर्ष संपण्याचे नाव घेत नाहीये. राष्ट्रवादीचे नेते आणि महाराष्ट्र सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांनी मंगळवारी पुन्हा एकदा समीर वानखेडे यांच्यावर मोठे आरोप केले आहेत.
नवाब मलिक म्हणाले की, समीर वानखेडे यांनी घातलेल्या शूजची किंमत 2 लाख रुपये आहे आणि त्यांच्या शर्टची किंमत 50,000 रुपयांपेक्षा जास्त असते. एनसीबीच्या दक्षता पथकाने वानखेडेंची चौकशी करावी असं आव्हान नवाब मलिक यांनी केलं आहे.
नवाब मलिक म्हणाले, ‘2020 मध्ये वानखेडे आल्यानंतर एनसीबीने एका प्रकरणात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानल, श्रद्धा कपूर आणि दीपिका पदुकोणलाही चोकशीसाठी बोलावण्यात आले होते.
आजपर्यंत तो खटला बंद होत नाही, आरोपपत्रही दाखल होत नाही, म्हणजे काय की 14 महिने केस बंद होत नाही. या प्रकरणी हजारो कोटींची वसुली करण्यात आली असल्याचं खळबळजनक आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.
वानखेडे यांच्याशिवाय नवाब मलिक यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनाही फैलावर घेत अनेक आरोप केले.