
मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) आणि नवाब मलिक (Nawab Malik) यांना अखेर सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. राज्यपाल भगत सिंह कोश्यारि यांनी महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारच्या बहुमत चाचणीसाठी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. या पार्श्वभूमीवर अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांनी किमान बहुमत चाचणीसाठी तरी विधिमंडळात हजर राहता यावे, यासाठी परवानगी देण्यासंदर्भात याचिका दाखल केली होती. दोन्ही नेत्यांची ही मागणी मान्य करण्यात आली आहे.