Navratri 2022 Wishes In Marathi: नवरात्री व घटस्थापनेच्या हार्दिक शुभेच्छा संदेश

WhatsApp Group

घटस्थापनेच्या हार्दिक शुभेच्छा – Navratri Wishes in Marathi : हिंदू सणांमध्ये नवरात्रि चा सण हा अतिशय महत्वाचा सण आहे. नवरात्र काळात देवी व तिच्या विविध रूपांची पूजा केली जाते. नवरात्रीची सुरुवात घटस्थापना (Ghatasthapana wishes, quotes in marathi) पासून होते. घटस्थापना नंतर च्या 9 दिवसानंतर दसरा येतो. आशा पद्धतीने नवरात्र चे नऊ दिवस देवी ची प्रतिमा स्थापित करून शक्ति ची पूजा, आराधना केली जाते.

आजच्या या लेखात आम्ही आपल्या करिता घटस्थापना च्या हार्दिक शुभेच्छा संदेश – Ghatasthapana wishes in marathi घेऊन आलो आहोत. हे नवरात्री व घटस्थापना मराठी शुभेच्छा (2022 Navratri wishes in Marathi) संदेश आपण आपले कुटुंबीय व मित्र मंडळीसोबत शेअर करू शकतात. व येत्या नवरात्रीच्या शुभेच्छा त्यांना देऊ शकतात. तर चला navratri shubhechha in marathi सुरू करूया..

ज्या क्षणाची वाट पाहत होतो तो क्षण आलाय
सिंहावर होऊन स्वार माझ्या देवी आई आल्यात
नवरात्र उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा..


अगं अंबे जगदंबे तू साऱ्या जगाची आई
तुझी कीर्ती पसरली दिशा दाही
नवरात्री च्या हार्दिक शुभेच्छा


आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला
अपरंपार महिमा तुझा धावून येसी संकटाला
सर्व भाविक भक्तांना नवरात्र उत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा


शक्ती अंगी येते आई तुझे नाव घेता
चैतन्य अंगी येते तुझे रूप पाहता
संकटे सगळे मिटून जातात तुझे स्मरण होता
सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा


अधर्माचा नाश करुनी धर्माला तारसी तू
अनाथांची होशी माय तू
भक्तांच्या एका हाकेशी धावून येशील तू
सर्व भक्तांना नवरात्र उत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा


भवानीचा वरदहस्त, दुर्गेची तुम्हाला मिळो साथ
शेरावाली प्रत्येक संकटाच्या वेळी देईल तुम्हाला हात
सर्व भक्तांना नवरात्रीच्या आणि दुर्गा पूजेच्या हार्दिक शुभेच्छा


आपली सर्व कार्य पूर्ण होवोत
कोणतेही स्वप्न अपूर्ण न राहो
धन धान्य व प्रेमाने भरलेले असो जीवन
ह्या नवरात्रीला घरात होवो देवीचे आगमन
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
घटस्थापना च्या हार्दिक शुभेच्छा