नवनीत राणा अडचणीत, तो व्हिडिओ झाला व्हायरल

WhatsApp Group

Lok Sabha Elections 2024: अमरावती लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार नवनीत राणा त्यांच्याच एका विधानामुळे अडचणीत आले आहेत. लोकसभेची निवडणूक आपल्याला ग्रामपंचायत सारखी लढवावी लागेल. आपले जेवढे मतदार आहेत ते सर्व बूथ पर्यंत नेले पाहिजे. जर कोणी फुग्यात राहत असेल की मोदींची हवा आहे. तर लक्षात ठेवा 2019 मध्ये मी अपक्ष म्हणून निवडून आले होते. एवढी मोठी यंत्रणा असूनही एका पक्ष उमेदवार निवडून येऊ शकतो. त्यामुळे कार्यकर्त्यांनी भ्रमात राहू नये, असे वक्तव्य नवनीत राणा यांनी केले होते. नवनीत राणा यांनी दिलेल्या वक्तव्याचा व्हिडिओही व्हायरल होत आहे.

मोदी लाट आहे अशा भ्रमात राहू नका. 2019 मध्येही मोदी लाट होती. पण तरीही मी अपक्ष उमेदवार म्हणून विजयी झाले. निवडणूक प्रचारादरम्यान त्यांनी हे वक्तव्य केले होते. नवनीत राणा यांनी गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर विजय मिळवला होता. तेव्हा राष्ट्रवादीत फूट पडली नव्हती.

त्याचवेळी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना यूबीटीने त्या योग्य बोलत असल्याचे म्हटले आहे. अशीच प्रतिक्रिया शरद पवार गटातील राष्ट्रवादी काँग्रेसकडून आली आहे. मोदी लाट नाही हे भाजपलाच कळून चुकले आहे, असे राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार यांचे प्रवक्ते महेश तपासे यांनी म्हटले आहे. ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत अशाच नेत्यांना मैदानात उतरवले जात आहे. त्या लोकांना तिकिटे दिली जात आहेत.

नवनीत राणा म्हणाल्या…

विरोधक माझा व्हिडिओ एडिट करून बातम्या पसरवत असल्याचे नवनीत राणा यांनी म्हटले आहे. मोदींच्या नावानेच लोकांकडून पाठिंबा मागितला जात आहे. देशाच्या विकासासाठी मोदी आवश्यक आहेत. मी फक्त मोदींच्या नावाने आणि देशाच्या हितासाठी लोकांकडून मते मागत आहे. विरोधकांनी गलिच्छ राजकारण करणे बंद करावे.