आम्हाला बंटी बबली म्हणणारे संजय राऊत शिवसेनेचे पोपट आहेत – नवनीत राणा

WhatsApp Group

मुंबई – शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आज राणा दाम्पत्यांना बंटी बबली म्हणून संबोधलं. तसेच दोघेही नवरा बायको स्टंट करत असल्याचंही ते म्हणाले. त्यांना शिवसैनिक तशास तसं उत्तर देईल, असा इशाराही दिला. त्यांच्या इशाऱ्याला खासदार नवनीत राणा यांनीही सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे.

शिवसैनिक आमचं काहीही वाकडं करु शकणार नाही. मी मुंबईची मुलगी आहे. माझा जन्म इथलाच आहे. मी विदर्भाची सून आहे. बजरंगबली माझ्या पाठिशी आहे. आम्हाला बंटी बबली म्हणणारे संजय राऊत हे शिवसेनेचे पोपट आहेत, अशा शब्दात नवनीत राणा यांनी राऊतांवर हल्ला चढवला आहे.

शिवसेना आम्हाला वापरत असलेली भाषा योग्य नाहीय. मी मुंबईची मुलगी आहे. विदर्भाची सून आहे. त्यामुळे मुंबई मला नवीन नाहीये. शिवसैनिक आमचं काहीचं वाकडं करु शकणार नाही. जर सत्ताधारी पक्षाची लोकं अशा प्रकारची विधाने करत असतील तर कायदा सुव्यवस्था भंग करण्याचे काम तेच करत आहेत”, असंही नवनीत राणा म्हणाल्या.