रश्मी ठाकरेंना तुरुंगात टाकले तर त्यांना मी…, नवनीत राणांची मुख्यमंत्र्यावर टीका

WhatsApp Group

मुंबई – शिवसेनेने सुरू केलेल्या शिवसंपर्क अभियानाअंतर्गत मुख्यमंत्री ठाकरे यांची सभा शनिवारी वांद्रे-कुर्ला संकुलातील मैदानावर झाली. या सभेमध्ये मुख्यमंत्री ठाकरे यांनी भाजपचे हिंदुत्व, केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर त्याचबरोबर राणा दाम्पत्यासह किरीट सोमय्या यांच्यावरही निशाणा साधला आहे.

मातोश्रीवर हनुमान चालिसा म्हणायला आलेले पळून गेले अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राणा दाम्पत्यावर टीका केली. दरम्यान आता नवनीत राणा यांनी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर दिले आहे.

जेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सत्ता जाईल आणि तेव्हा रश्मी ठाकरेंना तुरुंगात टाकले तर त्यांना मी कसं वाटतं असं विचारणार आहे. कोणताही गुन्हा न करता तुरुंगामध्ये टाकल्याच्या दुःख काय असते हे त्यांना विचारणार आहे.

ती वेळही लवकरच येणार आहे जेव्हा तुमची सत्ता जाईल आणि तुमच्या घरातील महिला तुरुंगामध्ये जाईल. तेव्हा मी विचारणार तुम्हाला कसे वाटते,” अशी टीका नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.

औरंगजेबाच्या कबरीवर फूल वाहणाऱ्यांवर तुम्ही एक शब्द बोलला नाहीत. सत्तेमध्ये आल्यानंतर औरंगाबादचं नाव संभाजीनगर करायचं तुम्हीच म्हणाला होता. पण सभेमध्ये बोलताना त्याची काही गरज नाही म्हणता. एक नाव बदलू शकत नाहीत, इतके लाचार मुख्यमंत्री आहेत,” असंही नवनीत राणा यावेळी बोलताना म्हणाल्या.