अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी नवनीत राणांना मिळालं भाजपचं तिकीट

WhatsApp Group

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ( Loksabha Election 2024 ) भाजपने सातवी यादी जाहीर केली आहे. या यादीत भाजपने अमरावतीच्या जागेवर नवनीत राणा (Navneet Rana) यांची घोषणा केली आहे. त्या या आधी अपक्ष खासदार होत्या. भाजपने आपल्या सातव्या यादीत लोकसभा निवडणुकीसाठी दोन उमेदवारांची घोषणा केली आहे. याआधी 2014 आणि 2019 ला राणा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर लढल्या होत्या.

नवनीत राणा हे अमरावतीच्या विद्यमान अपक्ष खासदार आहेत. त्यांनी 2019 मध्ये शिवसेनेचे आनंदराव अडसूळ यांचा पराभव करून अपक्ष उमेदवार म्हणून विजय मिळवला. त्या भाजपच्या समर्थक होत्या. एप्रिल 2022 मध्ये मुंबई पोलिसांनी नवनीत राणाविरुद्ध एफआयआर दाखल केला होता.

तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या खाजगी निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा पठण करण्याचा इशारा दिल्यानंतर त्यांच्या सकट त्यांच्या पतीला अटक करण्यात आली होती. त्यांनी अभिनेत्री म्हणून चित्रपटातही काम केले आहे.