पाक पंतप्रधान इम्रान खान माझ्या मोठ्या भावाप्रमाणे, सिद्धूचं पाक प्रेम पुन्हा आलं उफाळून!
पंजाब – भारताचे माजी क्रिकेटर आणि पंजाब काँग्रेसचे मोठे नेते नवज्योत सिंग सिद्धू शनिवारी पाकिस्तानातील करतारपूर साहिब येथे पोहोचले. करतारपूरला पोहोचल्यावर पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी पाठवलेल्या अधिकाऱ्यांनी सिद्धू यांचे मोठ्या मनाने स्वागतही केले. यावेळी दरम्यान नवज्योत सिंग सिद्धू यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानबद्दलचे आपले प्रेम उघडपणे दाखवत पाक पंतप्रधान इम्रान खान हे मला माझ्या मोठ्या भावासारखे असल्याचे म्हटले आहे.
नवज्योतसिंग सिद्धू यांनी इम्रान खान यांना मोठा भाऊ म्हणत असल्याचा व्हिडिओही समोर आला असून हा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे नवज्योत सिंग करतारपूर कॉरिडॉरने भारतीय सीमा ओलांडून पाकिस्ताच्या हद्दीत दाखल तेथे असलेले पाकिस्तानी रेंजर्स त्यांचे स्वागत करतात. त्यानंतर करतारपूर साहिबचे सीईओ मोहम्मद लतीफही त्यांना भेटायला येतात आणि त्यांचे मोठ्या मनाने स्वागत करतात.
सिद्धू यांच्या भेटीदरम्यान मोहम्मद लतीफ म्हणाले, इम्रान खान यांच्या वतीने मी तुमचे स्वागत करत आहबे. यावर सिद्धू म्हणाले की, मी आपला खूप आभारी असून इम्रान खान हा मला माझ्या मोठ्या भावाप्रमाणे आहे. यादरम्यान मोहम्मद लतीफ यांनी नवज्योतसिंग सिद्धूंसोबत आलेल्या सर्व नेत्याचे आणि मंत्र्यांचे पुष्पहार घालून स्वागत केले.
Rahul Gandhi’s favourite Navjot Singh Sidhu calls Pakistan Prime Minister Imran Khan his “bada bhai”. Last time he had hugged Gen Bajwa, Pakistan Army’s Chief, heaped praises.
Is it any surprise that the Gandhi siblings chose a Pakistan loving Sidhu over veteran Amarinder Singh? pic.twitter.com/zTLHEZT3bC
— Amit Malviya (@amitmalviya) November 20, 2021
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना मोठा भाऊ असं म्हटल्याने भाजपने सिद्धू आणि काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. भाजप प्रवक्ते संबित पात्रा म्हणाले की, नवज्योत सिंग सिद्धू यांनी पाकिस्तानात जाऊन इम्रान खानचा गौरव करू नये, पाकिस्तानची स्तुती करू नये, असे कधी होऊच शकत नाही. आज सिद्धू यांचे हे असं वागणं करोडो भारतीयांसाठी चिंतेची बाब असल्याचं ते म्हणाले.
भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनीही सिद्धूचा व्हिडिओ ट्विट केला आणि लिहिले की, राहुल गांधींचे आवडते नवज्योत सिंग सिद्धू पाक पंतप्रधान इम्रान खान यांना ‘बडा भाई’ म्हणतात. मागच्या वेळी त्यांनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल बाजवा यांना मिठी मारली होती आणि त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला होता. दिग्गज अमरिंदर सिंग यांच्यापेक्षा गांधी भावंडांनी पाकिस्तान प्रेम करणार्या सिद्धू यांची निवड केली यात काही आश्चर्य आहे का?