नवी मुंबई महापालिका निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढणार

WhatsApp Group

मुंबई – आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी रणशिंग फुंकलं आहे. महापालिका निवडणुकांमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी पक्षीय बलाबल वाढवण्याकडे सर्व राजकीय नेत्यांमध्ये रस्सीखेच सुरु आहे. नुकतंच (state election commission) राज्य निवडणूक आयोगाने १४ महापालिका निवडणुकांसाठी आरक्षण सोडत जाहीर केली. याच पार्श्वभूमीवर आता राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आलं आहे. नवी मुंबई महानगरपालिकेची (Navi Mumbai Municipal corporation) निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढणार आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीला जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावरही खलबत झाली असल्याचं समजते.