Viral Video: रेल्वेच्या डब्यातच ताणली मच्छरदानी! बिहारच्या ‘देसी टॅलेंट’चा व्हिडिओ पाहून नेटकरी चक्रावले
सोशल मीडियावर जर कोणत्या गोष्टीची सर्वात जास्त चर्चा होत असेल, तर ती म्हणजे भारतीय ‘जुगाड’. नुकताच एक असा व्हिडिओ व्हायरल झाला आहे, जो पाहून भल्याभल्यांचे डोके चक्रावले आहे. हे प्रकरण बिहारमधील दरभंगा स्टेशनवर उभ्या असलेल्या एका ट्रेनमधील आहे, जिथे एका प्रवाशाने शांत झोप घेण्यासाठी अशी शक्कल लढवली की पाहणारे पाहतच राहिले.
रेल्वेचा मजला बनवला हक्काचा ‘बेडरूम’
रेल्वेच्या जनरल डब्यात सीट मिळवण्यासाठी होणारी मारामारी आपण अनेकदा पाहिली असेल, पण हा व्हिडिओ काही वेगळ्याच पातळीवरचा आहे. व्हायरल क्लिपमध्ये दिसते की, गर्दीने भरलेल्या ट्रेनच्या मजल्यावर (floor) एक तरुण आरामात झोपला आहे. विशेष म्हणजे, डब्यातील प्रवाशांची वर्दळ आणि मच्छरांचा उपद्रव लक्षात घेऊन त्याने चक्क ‘मच्छरदानी’ लावून स्वतःचा सुरक्षित कोपरा तयार केला आहे. रेल्वेच्या डब्यात कोणी अशा प्रकारे मच्छरदानी लावू शकतं, याची कल्पनाही कोणी केली नसेल. व्हिडिओ शूट करणारा व्यक्ती म्हणतोय, “ई बिहार है भैया, यहाँ कुछ भी हो सकता है!”
View this post on Instagram
‘बिहार बिगिनर्ससाठी नाहीच!’
हा मजेशीर व्हिडिओ इन्स्टाग्रामवर @foofaji नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘बिहार बिगिनर्ससाठी नाहीये’. हा व्हिडिओ आतापर्यंत ३.५ लाखांहून अधिक लोकांनी पाहिला असून कमेंट सेक्शनमध्ये मजेशीर प्रतिकियांचा पाऊस पडत आहे. प्रवाशाने ज्या आत्मविश्वासाने सार्वजनिक ठिकाणी आपला खाजगी बेडरूम तयार केला, त्याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
सोशल मीडियावर कमेंट्सचा महापूर
हा व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने लिहिले, “जिथे आम्ही गमछा ठेवू ती आमची सीट, आणि जिथे मच्छरदानी ताणू तो आमचा बेडरूम!” दुसऱ्याने कमेंट केली की, “बिहारमध्ये टॅलेंटची काहीच कमतरता नाहीये, फक्त ते वापरण्याची पद्धत वेगळी आहे.” तर एकाने म्हटले, “हा माणूस तर पुढच्या पातळीवरचा निघाला.” एकंदरीत, प्रवासातील गैरसोयीवर मात करण्यासाठी या प्रवाशाने शोधलेला हा मार्ग सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.
