National Pizza Day: परफेक्ट होममेड पिझ्झा कसा बनवायचा? वाचा

WhatsApp Group

पिझ्झाचं नाव ऐकताच अथवा टिव्हीवर पिझ्झाची जाहिरात पाहतात तोंडाला अक्षरशः पाणी सुटतं. पिझ्झाचे विविध प्रकार बाजारात मिळतात. निरनिराळा बेस असलेले आणि निरनिराळ्या टॉपिंगचे पिझ्झा तुमचं मन वेधून घेतात. मात्र सध्या कोरोनाच्या काळात जर तुम्हाला बाजारातील पिझ्झा नको असेल तर तुम्ही घरच्या घरी स्वतःच्या हाताने विविध प्रकारचे पिझ्झा तयार करू शकता. यासाठी तुम्हाला फक्त पिझ्झा कसा करायचा हे माहीत असायला हवं. वास्तविक पिझ्झा घरच्या घरी तयार करणं अतिशय सोपं काम आहे. यासाठी जाणून घ्या या पिझ्झा रेसिपी मराठीतून

पिझ्झा बनवण्याचा सर्वात सोपा आणि झटपट प्रकार म्हणजे ब्रेड पिझ्झा. यासाठी तुम्हाला पिझ्झा बेस विकत आणण्याची अथवा पिझ्झा बेस बनवण्याची गरज नाही. शिवाय प्रत्येकाच्या घरी नाश्तासाठी ब्रेड असतोच. त्यामुळे पिझ्झाचा हा प्रकार अतिशय सोपा आणि कधीही करण्यासारखा आहे. तेव्हा जाणून घ्या झटपट होणारी पिझ्झा रेसिपी मराठीतून.

साहित्य 

 • ब्रेडचे स्लाईज अंदाजे चार
 • एक चमचा बटर
 • एक चिरलेला कांदा
 • एक चिरलेला टोमॅटो
 • एक चिरलेली सिमला मिरची
 • बेबी कॉर्न
 • चिरलेले मशरूम
 • पिझ्झा सॉस
 • टोमॅटो सॉस
 • चमचा ऑरेगॅनो
 • एक चमचा चिली फ्लेक्स
 • किसलेले मोझेरोला चीझ
 • चवीपुरतं मीठ

 पिझ्झा बनवण्याची कृती 

 • एका पॅनमध्ये थोड्या बटरवर कांदा, टॉमेटो आणि सिमला मिरची परतून घ्या.
 • त्यामध्ये आवडत असेल या अंदाजाने पिझ्झा सॉस, ऑरगॅनो, चिली फ्लेक्स मिक्स करा आणि पॅनखालील गॅस बंद करा.
 • वरून मीठ घालून मिश्रण मिक्स करा.
 • तव्यावर ब्रेडचे स्लाईज बटर लावून एकाबाजून शेकवा.
 • दुसऱ्या बाजूने शेकत ठेवा आणि वरच्या  बाजून पिझ्झाचे मिश्रण अथवा टॉपिंग ब्रेडला लावा.
 • वरून मस्त हवं तेवढं मोझेरेला चीझ पेरा.
 • चीझ मेल्ट झालं की वरून ऑरॅगेनो, चिली फ्लेक्स आणि सॉस टाकून सर्व्ह करा.

पनीर हा पदार्थ अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतो. शिवाय रोजच्या भाजी,स्नॅक्ससाठी लागत असल्यामुळे तो घरात नेहमीच असतो. पिझ्झा बेस विकत आणलेला असेल तर घरीच पिझ्झा करणं काहीच कठीण नाही. त्यामुळे मनसोक्त पनीर खाण्यासाठी ट्राय करा ही पिझ्झा रेसिपी मराठीतून

साहित्य 

 • पिझ्झा बेस
 • एक चिरलेला कांदा
 • एक चिरलेला टॉमॅटो
 • एक चिरलेली सिमला मिरची
 • अर्धी वाटी पनीर
 • मोझेरेला चीझ
 • पिझ्झा सॉस
 • टोमॅटो सॉस
 • काळीमिरी पावडर
 • चिली फ्लेक्स
 • बटर
 • चवीपुरतं मीठ

पिझ्झा बनवण्याची कृती 

 • पिझ्झा बेसला बटर लावा.
 • त्यावर पिझ्झा सॉस आणि टॉमेटो सॉस पिझ्झा बेसला नीट लावा.
 • वरून टॉपिंगसाठी चिरलेला कांदा, चिरलेला टोमॅटो, सिमला मिरची, पनीर, चीझ लावून घ्या
 • तयार पिझ्झा बेस पाच मिनीटे ओव्हनमध्ये ठेवा.
 • ओव्हन नसेल तर झाकण असलेल्या पॅनमध्ये तुम्ही तो गरम करू शकता.
 • वरून सॉस, काळीमिरी, चिली फ्लॅक्स, मीठ टाकून सर्व्ह करा.

व्हेज पिझ्झा 

पिझ्झा बनवण्याची आणि खाण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा पिझ्झा बेस स्वतः घरी तयार केलेला असतो. यासाठीच या पिझ्झासाठी आम्ही तुम्हाला पिझ्झा बेस तयार करण्यापासून पिझ्झा कसा करायचा हे सांगणार आहोत

साहित्य 

 • गव्हाचे आणि मैद्याचे पीठ प्रत्येकी अडीच कप
 • इस्ट
 • तेल दोन चमचे
 • चीज आवडीनुसार
 • चिरलेला टोमॅटो
 • चिरलेला कांदा
 • चिरलेली सिमला मिरची
 • चीझ
 • चवीपुरते मीठ
 • कोमट पाणी
 • इटालियन मसाला
 • अर्धा चमचा साखर

पिझ्झा बनवण्याची कृती 

 • सर्वात आधी पीठ आणि मैदा चाळून घ्या. त्यात बटर अथवा तेल, मीठ. इटालिअन मसाला टाका आणि चांगले मिक्स करा.
 • कणकेच्या मध्यभागी खड्डा करून त्यात साखर  आणि कोमट पाण्यात इस्ट अॅक्टिव्हेट करा. यीस्ट अॅक्टिव्हेट झाल्यावर पीठ मऊसर मळून घ्यावे.  पीठाला लवचिकता येईल इतपत ते मळून घ्या. पीठाच्या गोळ्याला तेल लावून ते एका भांड्यात वरून ओला फडका ठेवून पाच ते  सहा मिनीटे ठेवा. उबदार ठिकाणी ठेवल्यास पीठ लवकर फुगेल.
 • ओव्हन प्रीहिट करून घ्या आणि पिझ्झा बेक करण्यासाठी ट्रे तयार करा
 • ट्रेला ऑयलिंग आणि डस्टिंग करून घ्या
 • मळलेल्या पीठाला बेसप्रमाणे आकार द्या आणि तो ट्रेमध्ये ठेवा वरून काट्याने टोचे मारा.
 • साधारपणे २५० सेल्सिअसवर सहा ते सात मिनिटे पिझ्झा बेस बेक करा
 • बेक केलेल्या बेसवर बटर, सॉस, टोमॅटो, कांदा, सिमला मिरची, मीठ, चिली फ्लेक्स टाका आणि पिझ्झा आणखी पाच मिनीटे बेक करा.