National Herald Case: सोनिया गांधींना 21 जुलैला चौकशीसाठी हजर राहण्याची ईडीची नोटीस

WhatsApp Group

National Herald case: काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) पुन्हा एकदा नॅशनल हेराल्ड प्रकरणात चौकशीसाठी समन्स बजावले आहे, ईडीच्या समन्समध्ये सोनिया गांधी यांना 21 जुलै रोजी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.

याआधी जूनमध्येच त्यांची चौकशी होणार होती, मात्र त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे ईडीने तारीख वाढवली होती. या प्रकरणात सोनिया गांधी यांचे पुत्र राहुल गांधी यांची याआधी अनेकदा चौकशी केली आहे.