वर्ष 2025-26 पर्यंत पामच्या लागवडीखालील क्षेत्र 10 लाख हेक्टर पर्यंत वाढवण्याच्या आणि कच्च्या पाम तेलाचे उत्पादन 11.20 लाख टनांपर्यंत नेण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने ऑगस्ट 2021 मध्ये राष्ट्रीय खाद्यतेल अभियान – पामतेल सुरु केले. खाद्यतेलाच्या उत्पादनातील वाढीसोबतच या योजनेने खाद्यतेलाची आयात कमी करुन एकप्रकारे भारताचा आत्मनिर्भर भारताकडे होणारा प्रवास सुकर केला.
या योजनेअंतर्गत राज्य सरकारांनी 25 जुलै 2023 पासून पामतेल उत्पादकांसोबत पामच्या मेगा लागवड योजनेला आरंभ केला आहे. पतंजली फूड प्रा. लि, गोदरेज एग्रोवेट आणि 3F या तीन प्रमुख पामतेल प्रक्रिया कंपन्या लागवडीच्या विक्रमी क्षेत्र विस्तारासाठी आपापल्या राज्यातील शेतकऱ्यांसोबत यात सहभागी होत आहेत आणि प्रोत्साहन देत आहेत.
मेगा लागवड मोहीम 25 जुलै 2023 रोजी सुरू झाली आणि 12 ऑगस्ट 2023 पर्यंत सुरू राहील. आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, ओडिशा, कर्नाटक, गोवा, आसाम, त्रिपुरा, नागालँड, मिझोराम आणि अरुणाचल ही प्रमुख पाम तेल उत्पादक राज्ये या उपक्रमात सहभागी होणार आहेत.