नाशिकच्या एमजी रोड मार्केटमध्ये मध्यरात्री भीषण आग, 5 ते 6 दुकाने जळून खाक

0
WhatsApp Group

नाशिकमधील वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या एमजी रोडवर मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीत पाच ते सहा दुकाने जळून खाक झाली. अग्निशमन दलाकडून रात्री उशिरापर्यंत आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते. आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. सर्वत्र दिवाळीची धूम सुरू असताना नाशिकमध्येही उत्साहाचे वातावरण आहे. शहरातील एमजी रोड, मेनरोड परिसरात मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. दरम्यान, काल मध्यरात्री एमजी रोडवर भीषण आग लागली.

वर्धमान शोरूमला आग लागली
शहरातील एमजी रोडवरील रेडक्रॉस सिग्नलजवळील वर्धमान शोरूमला रात्री अकराच्या सुमारास भीषण आग लागली. काही वेळातच आगीने उग्र रूप धारण केले. त्यामुळे या दुकानाला लागून असलेला बुक डेपो, संगीत शाळा आणि आजूबाजूची 5 ते 6 दुकानेही मोठ्या प्रमाणात जळून खाक झाली. या सर्व दुकानांमध्ये दिवाळीचे साहित्य उपलब्ध असल्याने आगीच्या घटनेत कोट्यवधी रुपयांचे साहित्य जळून खाक झाल्याचे बोलले जात आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या सुमारे 15 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. रात्री उशिरापर्यंत आग विझवण्याचे प्रयत्न सुरू होते. फटाक्यांमुळे ही आग लागल्याचे समजते, मात्र नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.

या आगीत सुमारे 5 ते 6 दुकाने जळून खाक झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाकडून रात्री उशिरापर्यंत शर्थीचे प्रयत्न सुरू होते. दिवाळीच्या दिवशी महाराष्ट्रातील अनेक भागात आग लागल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत.