
नाशिक येथील एका कारखान्याला भीषण आग लागल्याचे वृत्त समोर आलं आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, कारखान्यात अनेक मजूर अडकल्याची शक्यता आहे. नाशिकच्या मुंढेगाव येथील एका कारखान्यात सकाळी 11 वाजता बॉयलरचा भीषण स्फोट होऊन आग लागल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी आग विझवण्याचे प्रयत्न करत आहेत.
कारखान्याला लागलेली आग अतिशय भीषण असल्याचे सांगण्यात येत आहे. आतापर्यंत सुमारे 11 जणांना बाहेर काढण्यात आले आहे. अनेक कर्मचारी आत अडकले आहेत. आतमध्ये नेमके किती मजूर अडकले आहेत याबाबत अद्याप कोणतीही अचूक माहिती मिळालेली नाही. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. सध्या मदत आणि बचावकार्य सुरू आहे.