Video: नासाने शेअर केली Jupiter ची James Webb Space Telescope ने टिपलेली खास झलक

WhatsApp Group

आपल्या आकाशगंगेमधील सर्वात मोठा ग्रह ‘गुरू’ ची खास झलक नासा ने आपल्या  James Webb Space Telescope द्वारा टिपली आहे. यामध्ये गुरू ग्रहाचं अद्भूत रूप पहायला मिळालं आहे. दरम्यान या फोटो द्वारा वैज्ञानिकांना गुरूवरील जीवनाचा अभ्यास करण्यासाठी अधिक माहिती मिळणार आहे.

यामध्ये गुरू ग्रहाचे दोन छोटे उपग्रह आणि त्यामागील आकाशगंगा देखील पूर्णपणे दिसत आहेत. गुरु ग्रहाचे असे चित्र आतापर्यंत घेतले गेले नव्हते. जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपने काढलेले हे चित्र पाहता गुरूला सौरमालेचा राजा म्हणता येईल. या चित्रात ज्या बारीकसारीक गोष्टी दिसल्या आहेत त्या आजवर कोणत्याही अवकाशयानाने किंवा दुर्बिणीने पाहिल्या नव्हत्या. तर नासाने (NASA) जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपने टिपलेल्या गुरूच्या नवीन आश्चर्यकारक प्रतिमा पोस्ट केल्या आहेत.