शिवसेनेला पुन्हा मोठा धक्का! एकनाथ शिंदेंच्या समर्थनार्थ आला पहिला राजीनामा

WhatsApp Group

मुंबई – ठाण्यातून एक सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के शिवसेना जिल्हाप्रमुखपदाचा राजीनामा दिला आहे. नरेश म्हस्के हे ठाण्यातील मोठं नाव आहे. म्हस्के हे शिवसेनेचे ठाण्यातील आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. ठाणे महापालिकेचे महापौर म्हणून देखील त्यांनी काम पाहिलेलं आहे. त्यामुळे शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखपदाचा त्यांनी राजीनामा दिल्यामुळे ठाण्यातील कार्यकर्त्यांची नाराजी यातून स्पष्ट दिसून येत आहे.

ठाण्यातील सर्व नगरसेवक आणि कार्यकर्ते हे आज बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या बाजूने उभे आहेत हे यातून दिसून येत आहे. पण या सर्वांनी आपण शिवसेना सोडलेली नाही, असंही स्पष्टपणे सांगितलं आहे.

भगवे आमचे रक्त तळपते,तप्त हिंदवी बाणा..जात,गोत्र अन् धर्म अमुचा शिवसेना , शिवसेना ,शिवसेना…! शिवसैनिक होतो, आहे आणि राहणारच..पण गेले अडीचवर्षे आपल्या संघटनेची “राष्ट्रवादी” गळचेपी चाललेय त्याचा निषेध म्हणून जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा देत आहे. जय महाराष्ट्र! असं ट्वीट करत त्यांनी राजीनामा दिला आहे.