
भाजप आमदार नितेश राणे यांनी बुधवारी अभिनेता सुशांत सिंग राजपूत आणि त्याची माजी व्यवस्थापक दिशा साल्वियन यांच्या मृत्यूबाबत आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली आहे. कणकवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितेश राणे म्हणाले,”जेव्हापासून सुशांत आणि दिशा सालियनचा मुद्दा काढला जातो तेव्हा आदित्य ठाकरेंचेच नाव का घेतले जाते. महाराष्ट्रात असे अनेक नेते आहेत, त्यांची नावे का येत नाहीत. असंही नितेश राणे यावेळी बोलताना म्हणाले.
नितेश राणे म्हणाले, सत्य जाणून घेण्यासाठी आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट करावी. आफताब पूनावालाची श्रद्धा वालकरच्या मृत्यूप्रकरणी जशी नार्को चाचणी झाली होती, त्याच पद्धतीने आदित्य ठाकरे यांचीही नार्को चाचणी झाली पाहिजे. A आफताबसाठी आणि A आदित्यसाठी. एयू नावाच्या व्यक्तीने रिया चक्रवर्तीला 44 कॉल का केले याचे सत्य जाणून घेतले पाहिजे.
अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या मृत्यूचा मुद्दा बुधवारी लोकसभेत उपस्थित झाला. एकनाथ शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. शेवाळे यांनी दावा केला की, सुशांत सिंग राजपूतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीच्या फोनवर एयू नावाने 44 कॉल आले होते. बिहार पोलिसांच्या म्हणण्यानुसार, AU म्हणजे आदित्य आणि उद्धव.