
भाजापा नेते व केंद्रीयमंत्री नारायण राणे आणि शिवसेना (ठाकरे गट) नेते व खासदार संजय राऊत यांच्यातील वाद आता चांगलाचं रंगला आहे. संजय राऊतांविरोधात आपण तक्रार दाखल करणार असल्याचा नारायण राणेंनी इशारा दिला होता त्यानंतर संजय राऊतांनीही राणेंविरोधात आक्रमक भूमिका घेत माध्यमांशी बोलताना थेट एकेरी भाषेतच त्यांना प्रत्युत्तर दिलं होतं. दरम्यान आता नारायण राणे यांनी पुन्हा एकदा संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.
नारायण राणे माध्यमांशी बोलताना म्हणाले, एक दिवस मी उद्धव ठाकरेंना भेटणार आहे. मी खासदार झाल्यानंतर संजय राऊत राज्यसभेत येऊन बसायचा आणि उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्याबद्धल जे काही सांगायचा ते मी उद्धव ठाकरेंना भेटून सांगणार. चप्पलने नाय मारलं उद्धवने रश्मीने तर मला विचारा. संजय राऊत हा शिवसेना वाढवणारा नाही संपवणारा आहे. मातोश्रीला सुरुंग लावणार हे विष आहे. मातोश्रीबद्दल संजय राऊतांची भूमिका योग्य नाही, असं राणे यांचं म्हणणं आहे.
संजय राऊत काय म्हणाले होते?
संजय राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले होते की, “पादरा पावटा आहे तो बाळासाहेबांच्या भाषेत, पादरा माणूस आहे. आतापर्यंत मी त्याच्याविषयी काही बोललो नाही, हा सगळ्यांना अरे तुरे करतो हा कोण आहे? मुख्यमंत्र्यांना अरे तुरे, कालपर्यंत एकनाथ शिंदे यांना अरे तुरे करत होता. जुने व्हिडीओ काढा त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही अरे तुरे. हे कोण आहेत, यांची चौकशी करा. आता मी करणार, आता मी काढतो. कालपर्यंतमी शांत होतो. पण तुम्ही जर रोज आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आम्ही सगळे, फडणवीस, अशोक चव्हाण, अहमद पटेल, सोनिया गांधी, मोदी सगळ्यांवरती अरे तुरे करता, अरे तुरे कोण तुम्ही? डरपोक लोक आहात तुम्ही. तुम्ही ईडी आणि सीबीआयचया भीतीने पळून गेलात तुमच्या किरीट सोमय्यांनी तुमच्यावर जे आरोप केलेत, त्यावर उत्तर दिलं का तुम्ही? कुठे आहे किरीट सोमय्या आता?
संजय राऊत पुढे म्हणाले, राऊत विरुद्ध राणे वैगरे असं काही नाही, त्याला वेड लागलं आहे. तो वेड्यांच्या कळपात आहे. त्या नारायण राणेची सटकली आहे. तो आमच्यावर टीका करत होता तरी मी कालपर्यंत त्याचा आदराने उल्लेख करत होतो. मी त्याला कधी एक शब्द बोललो नाही. पण कोण आहे हा माणूस, डरपोक माणूस याचं मंत्रीपद जातयं. अशा शब्दांत संजय राऊत यांनी नारायण राणेंवर टीका केली.