केंद्रीय मंत्री नारायण राणे मराठा आरक्षण आंदोलनाचे महत्त्वाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर तीव्र शब्दात टीका केली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचााजचा पाचवा दिवस आहे. पाठिमागील 10 फेब्रुवारीपासून ते उपोषणाला बसले आहेत. त्यांची प्रकृती कमालीची खालावली आहे. त्यांच्या नाकातून रस्तस्त्राव होऊ लागला आहे. अशा परिस्थीत त्यांना वैद्यकीय उपचारांची सक्त गरज असल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे. दरम्यान, राणे यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. या टीकेमुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
नारायण राणे यांनी आपल्या एक्स हँडलवरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, ”मनोज जरांगे पाटील याच्या डोक्यावर परिणाम झाल्यामळे तो आता काहीही बडबड करायला लागला आहे. त्याला मी मराठयांचा नेता मानत नाही. देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रात फिरु देणार नाही अशी बेताल बडबड त्याने केली. त्याने आता मर्यादा ओलांडली आहे. माननीय पंतप्रधान जेंव्हा महाराष्ट्रात येतील त्यावेळी जागेवरुन हलून दाखव. तुला असली मराठ्यांची ताकद दाखवून दिली जाईल. आपली औकात ओळखावी आणि अंथरुणावर पडून राहून नाटके करावीत.”
मनोज जरांगे पाटील याच्या डोक्यावर परिणाम झाल्यामळे तो आता काहीही बडबड करायला लागला आहे. त्याला मी मराठयांचा नेता मानत नाही. देशाचे पंतप्रधान माननीय श्री. नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रात फिरु देणार नाही अशी बेताल बडबड त्याने केली. त्याने आता मर्यादा ओलांडली आहे. माननीय…
— Narayan Rane (@MeNarayanRane) February 14, 2024
नारायण राणेंच्या टीकेवर संताप
दरम्यान, नारायण राणे यांनी केलेल्या एक्सपोस्ट आणि टीकेवरुन मराठा समाजातून संताप व्यक्त केला जातो आहे. अनेकांनी नारायण राणे यांच्या टीकेला प्रत्युत्तर देत आपला संताप व्यक्त केला आहे. सोशल मीडियावर नारायण राणे यांच्याबद्दल अनेक मिम्सही व्हारल झाले आहेत. दरम्यान, या वक्तव्यावर नारायण राणे काही प्रतिक्रिया देतात का याबाबत उत्सुकता आहे.