मुंबई : केंद्रीय सुक्ष्म आणि लघु उद्योग मंत्री नारायण राणेंना Narayan Rane त्यांच्या जुहूतील बंगल्यातील अनधिकृत बांधकामाप्रकरणी BMC ने नोटीस बजावली होती. पालिकेचं पथक शुक्रवारी राणेंच्या बंगल्यात तपास करण्यासाठी जाणार आहे. अनधिकृत बांधकामांचं मोजमाप घेण्याचं काम हे पथक करेल. पालिकेच्या के-पश्चिम वॉर्डनं नारायण राणेंना नोटीस पाठवली आहे.
ही नोटिस पाठवल्यानंतर नारायण राणेंनी एक फेसबुक पोस्ट करत शिवसेनेवर Shiv Sena निशाना साधला आहे. नारायण राणे यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहीले आहे की. “खासदार विनायक राऊत यांच्यासाठी खास बातमी…लवकरच सुशांतसिंग व सामुदायिक बलात्कार करून तिची हत्या केली त्या दिशा सालियन या दोघांचीही आत्महत्या नव्हे हत्या झाली त्यांचीही चौकशी परत होईल एवढेच नाही तर मातोश्रीच्या चौघांवर ईडीची नोटीस तयार असल्याचे कळाले. विनायक राऊत हे घडल्यावर आपले “बॉस ” आणि आपण कुठे धावणार ?”
नारायण राणेंना पाठवण्यात आलेल्या नोटीसमध्ये, राणेंच्या जुहू तारा रोडवरील अधिश बंगल्याची पाहणी करण्यासाठी के-पश्चिम वॉर्डच्या इमारत प्रस्ताव विभागाचं पथक शुक्रवारी येईल आणि अनधिकृत बांधकामाची पडताळणी या पथकाकडून केली जाईल, असं नमूद करण्यात आलं आहे.