कारवाई करायला माझं घरं दिसतं, बेकायदेशीर भोंगे दिसत नाही का? – नारायण राणे

WhatsApp Group

मुंबई – हिंदुत्वाशी गद्दारी करत फक्त खुर्चीसाठी आणि सत्तेसाठी शिवसेनेने काँग्रेस राष्ट्रवादीचा हात धरला आहे. बाळासाहेबांनी कधीही हिंदुत्वाशी तडजोड केली नाही. पण गेल्या दोन वर्षामध्ये शिवसेना पक्षप्रमुखांनी हिंदुत्वाच्या संबंधी कशा भूमिका घेतल्या, हे राज्याने पाहिलं आहेत. यांना कारवाई करायला माझं घरं दिसतं, बेकायदेशीर भोंगे दिसत नाही का?, असा सवाल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विचारला आहे.

माझ्या घरासंबंधी माझ्यावर कायदेशीर कारवाई केली गेली नाही. ही कारवाई फक्त राजकारणासाठी करण्यात आली. आयुक्तांना फक्त माझंच एकट्याचं घर दिसतं आहे. इतर ठिकाणी ते डोळे झाकून फिरतात. ते मुख्यमंत्रीही तसेच… सूड म्हणून ही कारवाई होत आहे.

पण अशा कारवायांना मी भीक घालत नाही. कारवाया करुन आम्ही शांत बसू असे त्यांना वाटत आहे. पण त्यांचा तो गैरसमज आहे. माझ्याकडे अनेकांचे रेकॉर्ड आहेत, वेळ आली की उघडे करेन, असा इशाराही नारायण राणे यांनी यावेळी बोलताना दिला.

राज्याला मुख्यमंत्री कुठे आहेत? राज्य दिवाळखोरीत चाललं आहे, राज्यात कायदा सुव्यवस्था राहिली नाही. कारण मुख्यमंत्र्यांचा जरब नाही. अडीज वर्षांचा कारभार मुख्यमंत्र्यांनी दोन तासांमध्ये उरकला, अशा शब्दात नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार प्रहार केले.