मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे Union Minister Narayan Rane यांनी आज मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेत विविध मुद्दयांवर भाष्य केले आहे. यावेळी नारायण राणे यांनी थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. काल नारायण राणे यांनी ट्विट करत मातोश्रीच्या Matoshree चौघांवर ईडीची नोटीस तयार असल्याचे कळाले आहे असे म्हटले होते. त्यावर पत्रकार परिषदेत विचारले असता नारायण राणे यांनी यावेळी बोलताना खळबळजनक दावा केला आहे.
नारायण राणे म्हणाले की, “सर्व प्रॉपर्टीबद्दल मी योग्य माहिती दिली आहे. छगन भुजबळ आत गेले अडीच वर्षे… सेम ऑफेन्स मातोश्रीचे आहेत. आणि सीए हा दोघांचा एकच आहे. माझ्याकडे जेवढी माहिती आहे तेवढी कोणाकडे नाहीय. मी इन्कम टॅक्समध्ये 13 वर्षे होतो. ”
मुंबई येथील पत्रकार परिषदेतून लाईव्ह https://t.co/ggx1cVEW8e
— Narayan Rane (@MeNarayanRane) February 19, 2022
मी जाहीरपणे बोललो, “मीडियाला सांगितले याचा अर्थ काही असल्याशिवाय आहे का? आता मी तुम्हाला भुजबळांचे उदाहरण दिले तुमच्या इतकेही लक्षात येत नाही. सेम ऑफेन्स आहे. भुजबळ अडीच वर्षे कारागृहात गेले होते मग हे का नाही गेले? असा सवालही नारायण राणे यांनी उपस्थित केला. “