कोकणी माणसासाठी जे जे शक्य आहे ते सर्व करणार – केंद्रीय मंत्री नारायण राणे

WhatsApp Group

सिंधुदुर्ग – मालवण देवबागेत आल्यानंतर मच्छिमारांशी संवाद साधताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे डोळे पाणावले. सातव्या वेळी मी का पडलो, हे मला समजलं नाही. पडलो त्यावेळी मी बाजूला हेलिकॉप्टर होतं, त्यात बसून मी थेट मुंबईला गेलो. जिल्ह्यात थांबलो नाही असं ते म्हणाले आहेत.

देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सामाजिक कार्य करण्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण देवबाग गावामध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी मच्छीमारांची संवाद साधला.

सातव्या वेळी निवडणुकीमध्ये पराभूत झाल्याचा शल्य मनात दाटून आल्यानंतर नारायण राणे यांचे डोळे पाणावले. त्यावेळी बोलताना ते म्हणाले की, “1990 पासून मी आमदार म्हणून या मतदारसंघातून निवडून जात होतो. मात्र मला सातव्या वेळी पाडलं. मी माझ्या राजकारणाच्या या कार्यकाळामध्ये मुख्यमंत्री, उद्योग मंत्री, महसूल मंत्री अशी अनेक पदे भूषवली. अनेक खाती समर्थपणे सांभाळली.राज्यात नाव केलं. राणेंकडे खातं द्या, राणे त्या त्यालाच न्याय देतील असं नाव मी कमावलं.

मात्र सातव्या वेळी मी का पडलो, हे मला समजळे नाही. पडलो त्यावेळी मी बाजूला हेलिकॉप्टर होतं, त्यात बसून मी थेट मुंबईला गेलो. जिल्ह्यात थांबलो नाही. मात्र तुम्ही निवडून दिलेला आमदार या मतदारसंघातल्या कामांविषयी विधानसभेमध्ये बोलू शकत नाही. काम आणू शकत नाही. मात्र कुठली काम आली की दहा टक्के मागण्याचे काम हा आमदार करतो.

नारायण राणे पुढे म्हणाले की, “माझे प्रेम मालवण तारकर्ली देवबाग यांच्याशी जोडलेले आहे. ते भावनिक आहे. मतदार म्हणून माझे नाते कधीच नाही. आमदार झालो तेव्हा कणकवलीपेक्षा मालवण मध्ये जास्त मते होती. मी राज्यामध्ये जेव्हा आमदार होतो त्यावेळी सिंधुदुर्गात अनेक योजना आणल्या. ज्या दिवशी माझा पराभव झाला तो विश्वास न बसणारा आहे.

देशात अग्रगण्य असे हॉस्पिटल पडवे येथे उभारले. त्या ठिकाणी सर्व सुविधा पुरवल्या. मेडिकल कॉलेज उभारले. अत्याधुनिक सोई सुविधा आहेत. कॉलेज, हॉस्पिटल सर्व सुविधा आणल्या. तातू सीताराम राणे ट्रस्ट जनहितासाठी उभारले, त्या माध्यमातून अनेकांना मदत करण्यात येते. माझ्या कोकणी माणसासाठी जे जे शक्य आहे ते सर्व करणार. विविध मंत्रीपदे, मुख्यमंत्रीपद भूषवले हे कोकणी माणसांमुळे. असं नारायण राणे यावेळी बोलताना म्हणाले आहेत.