“राऊत नीच माणूस, तो पत्रकार नसून जोकर, तर उद्धव ठाकरे कपटी” नारायण राणेंचा प्रहर

WhatsApp Group

नवी दिल्ली : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार प्रहार केला. या पत्रकार परिषदेत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मारायची सुपारी दिली होती, असंही म्हटलंय.

संजय राऊत नीच माणूस असून तो जोकर आहे, पत्रकार नाही, असा जोरदार हल्लाबोल नारायण राणे यांनी संजय राऊतांवर केला. तसेच उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेचा विश्वासघात केला असंही त्यांनी म्हटलंय. हिंदुत्व सोडून काँग्रेस राष्ट्रवादी सोबत गेल्यामुळे आता शिवसेना उभी राहणार नाही असंही नारायण राणे म्हणाले.

उद्धव ठाकरे यांच्या नावामधून बाळासाहेब ठाकरे हे नावं काढलं तर ते शुन्य आहेत. तसेच शिवसैनिकांच्या नावावर उद्धव ठाकरे यांनी खोके जमा केल्याचा गंभीर आरोप नारायण राणे यांनी केला आहे. उद्धव ठाकरेंना मी जवळून ओळखत असून त्यांच्या अंगात कपटीपणा आहे, असंही नारायण म्हणाले.