”उद्धव ठाकरे जगातला ढ माणूस आहे, राऊतसोबत हा पण जेलमध्ये जाणार”, नारायण राणेंची जहरी टीका

WhatsApp Group

भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राजधानी दिल्लीत आज (22 सप्टेंबर) पत्रकार परिषद घेऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे हा जगातील ढ व्यक्ती असून आता तो देखील संजय राऊतप्रमाणे तुरुंगात जाणार.’ अशी एकेरी भाषेतील टीका नारायण राणेंनी केली आहे.

उद्धव ठाकरे यांनी काल मुंबईतील गट प्रमुखांच्या मेळाव्यात भाजपवर तुफान टीका केली होती. त्यांच्या याच टीकेला आज तात्काळ पत्रकार परिषद घेऊन नारायण राणेंनी प्रत्युत्तर दिले आहे. मात्र यावेळी नारायण राणेंनी संपूर्ण पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांचा एकेरीच उल्लेख केला.

नारायण राणे यावेळी बोलताना म्हणाले, उद्धव ठाकरे जगातला ढ माणूस आहे. ठाकरे खोटं बोलून लोकांची फसवणूक करतात. 10 आमदार निवडूण आणण्याची यांच्याकडे ताकद नाही. पदासाठी, पैशांसाठी, हिंदुत्वाशी गद्दारी करणारे उद्धव ठाकरे आहेत, ठाकरे कुटुंब जेलमध्ये जाणार, अशा शब्दांत राणे यांनी ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे.

गद्दारांना सत्तेचं दूध पाजलं असे उद्धव म्हणतात, मग सत्तेमध्ये असताना खोक्याच्या रुपात तूप कोणी खाल्ल, असा हल्लाबोल करत उद्धव ठाकरेंची औकात आहे का ? हिंदुत्वासाठी कोणतं काम केलं…? अशी जहरी टीका नारायण राणे यांनी केली. मुंबईवर गिधाडे फिरत असल्याची उपमा उद्धव ठाकरे यांनी दिली. पण तो लबाड लांडगा आहे. किती खोटं बोलतो. खरं कधी बोलत नाही. असं नारायण राणे यावेळी बोलताना म्हणाले.

INSIDE मराठीचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा