
मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पुन्हा एकदा आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. आदित्य ठाकरेंवर टीका करताना राणे म्हणाले, की ‘आदित्यला काय कळतं. तो जी काय मागणी करत होता कंपनीकडे ती आता काहीच दिवसात बाहेर येईल. तुमचा काळ संपला. भविष्यात मंत्री मुख्यमंत्री यासारखी संधी तुम्हाला कधीच नाही मिळणार. तुम्ही फक्त ट्विट करत राहा, पण ते कोणी वाचणार नाही’, असा शब्दांत नारायण राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
आदित्य ठाकरे यांच्या रत्नागिरी दौऱ्यावर विचारले असता राणे यांनी ‘कोण ओळखतं त्याला’? असा सवाल केला आहे. वेदांता-फॉक्सकॉन हा लाखो कोटींची गुंतवणूक आणि लाखांहून अधिक रोजगार निर्माण करणारा प्रकल्प गुजरातमध्ये गेल्यामुळे राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. विरोधी पक्षात असलेल्या महाविकास आघाडीमधील घटक पक्षांसह विविध क्षेत्रातून शिंदे-फडणवीस सरकारवर टीकेची झोड उठत आहे. यावरही राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नारायण राणे पुढे मनाळे, याबाबत जे काही ठरेल, ते आम्ही लवकरच सांगू. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघंही याबाबत चर्चा करत आहेत. पंतप्रधानांसोबत यासाठी अद्याप नवीन भेट ठरली नाही. उद्धव ठाकरेंना घर सोडत नाही. त्यांना आता काय काम आहे? घर बसल्या मीडियाला ब्रेकिंग न्यूज देण्याच काम करत आहेत. स्वतः काही करू शकले नाहीत, त्यांच्या पापामुळे कंपनी महाराष्ट्रातून गेली, असा आरोपही राणा यांनी केला आहे.