
काही वेळापूर्वीच शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेनेच्या बंडखोर शिंदे गटातील आमदारांना मुंबईत येउद्या त्यातले अनेक आमदार एकनाथ शिंदे यांचा पाठिंबा काढून घेतील असं म्हटलं होतं. दरम्यान आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ट्वीट करत थेट शरद पवारांनाच धमकी दिली आहे. शरद पवार साहेब या सर्वांना धमक्या देत आहेत, ‘सभागृहात येऊन दाखवा’, ते येणारच आहेत. ते येणार आणि त्यांच्या मनाप्रमाणे मतदान करणार. त्यांच्या केसालाही धक्का लावल्यास घर गाठणे कठिण होईल. असं ट्वीट नारायण राणे यांनी केलं आहे.
माननीय शरद पवार साहेब या सर्वांना धमक्या देत आहेत, ‘सभागृहात येऊन दाखवा’, ते येणारच आहेत. ते येणार आणि त्यांच्या मनाप्रमाणे मतदान करणार. त्यांच्या केसालाही धक्का लावल्यास घर गाठणे कठिण होईल.
— Narayan Rane (@MeNarayanRane) June 23, 2022
महाविकास आघाडी सरकार हे सोयीसाठी व स्वार्थासाठी तयार झालेले सरकार आहे, त्यामुळे कामाच्या व कार्याच्या बढाया मारू नयेत. काहीजणांनी अनेक वेळा बंडखोरी केली. त्या बंडखोरीचा इतिहास उभ्या महाराष्ट्राला माहीत आहे. नको त्या क्षणी नको त्या वयात मान्यवरांना धमक्या देणे शोभत नाही. संजय राऊत तुमचे (शिवसेना) किती आमदार राहिलेत? मतदानाची अपेक्षा करू नका, पराभवाची करा. असं ट्वीट करत त्यांनी संजय राऊत यांच्यावरही टीका केली आहे.
संजय राऊत तुमचे (शिवसेना) किती आमदार राहिलेत? मतदानाची अपेक्षा करू नका, पराभवाची करा.
— Narayan Rane (@MeNarayanRane) June 23, 2022