मुंबई – केंद्रीय मंत्री नारायण राणे Narayan Rane आणि त्यांचे पुत्र आमदार नितेश राणे Nitesh Rane यांनी शनिवारी मालवणी पोलीस ठाण्यात Malvani Police Station त्यांच्याविरुद्ध मानहानीच्या खटल्यात जबाब नोंदवला आहे. दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियनबद्दल अपमानास्पद टिप्पणी आणि खोटी माहिती पसरवल्याबद्दल नारायण राणे आणि नितेश यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
भारतीय जनता पक्षाचे नेते नारायण राणे आणि त्यांचा मुलगा दुपारी 2.45 च्या सुमारास तेथे पोहोचले तेव्हा राणेंचे समर्थक मोठ्या संख्येने पश्चिम उपनगरातील पोलीस स्टेशनच्या बाहेर जमले आणि घोषणाबाजी केली, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. मालवणी पोलिसांनी नितेश राणे यांना गुरुवारी तर नारायण राणे यांना शुक्रवारी तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याची नोटीस पाठवली होती.
परंतु राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असल्याने वरील तारखेला कर्तव्य बजावण्यास प्राधान्य देणार असून शनिवारी पोलिसांसमोर हजर होणार असल्याचे त्यांनी वकिलामार्फत पोलिसांना सांगितले. येथील न्यायालयाने शुक्रवारी राणे पिता-पुत्राला १० मार्चपर्यंत अटकेपासून अंतरिम संरक्षण दिले होते.
मालवणी पोलिसांनी नोंदवलेल्या एफआयआरनुसार, नारायण राणे यांनी 19 फेब्रुवारीला पत्रकार परिषदेत काही वक्तव्य केले होते, जिथे त्यांचा मुलगा देखील उपस्थित होता. पत्रकार परिषदेत दिशा सालियन यांच्या मृत्यूबाबत काही दावे केले होते. सुशांतचा मृतदेह सापडण्याच्या सहा दिवस आधी दिशा सालियनने 8 जून 2020 ला मालाडमधील एका इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली होती.
ब्रेकिंग न्यूज आणि लाईव्ह न्यूज अपडेटसाठी आम्हाला Facebook वर लाईक करा किंवा Twitter वर फॉलो करा.