Narali Purnima 2022 Marathi Wishes: नारळी पौर्णिमेच्या खास मराठमोळ्या शुभेच्छा…

WhatsApp Group

श्रावणी पौर्णिमा (Shravani Purnima) नारळी पौर्णिमा (Narali Purnima) हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. महाराष्ट्रात मुंबई आणि कोकणातील कोळी आणि आगरी बांधवांसाठी खास असणारा हा सण यंदा 11 ऑगस्ट दिवशी साजरा केला जाणार आहे.

सूर्याने मृग नक्षत्रात प्रवेश केल्यानंतर पावसाला जोरदार सुरूवात होते. समुद्र उधाणलेला असतो. निसर्गचक्राच्या नियमांनुसार साधारणपणे श्रावण पौर्णिमेपर्यंत मुसळधार पाऊस पडतो. त्यानंतर तो ओसरतो. परिणामी मच्छिमारांना श्रावणी पौर्णिमेनंतर समुद्रात नौका उतरवण्याची संधी मिळते. म्हणजेच मासेमारीचा हंगाम पुन्हा सुरू होतो. मच्छिमार बांधव नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्राला नारळ अर्पण करतात. त्यामुळे श्रावणी पौर्णिमेला ‘नारळी पौर्णिमा’ असे संबोधले जाते. उधाणलेला समुद्र शांत व्हावा, यासाठी कोळी बांधव सहकुटुंब वरुणराजाला प्रार्थना करतात.

नारळी पौर्णिमा उत्साहात, जल्लोषात साजारा करण्यासाठी कोळी बांधवांना नारळी पौर्णिमेच्या खास मराठमोळ्या शुभेच्छा..

भावाबहिणीचे आणि कोळी दर्याचे नाते अतूट
सर्व कोळी बांधवाना
नारळीपौर्णिमेच्या..
आणि बंधुभगिनींना
🥥🌺✨ रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा 🥥🌺✨

कोकण म्हणजे लाल मातीतली वाट,
कोकण म्हणजे निसर्गाचा थाट..
कोकण म्हणजे भरलेला पापलेट,
कोकण म्हणजे वडे सागोतीचं ताट..
🥥🌺✨ नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 🥥🌺✨

ह्या मोसमात पापलेट, सुरमई, रावस, हलवा, घोळ,
मोरी, बांगडा, बोंबिल, मांदेली यांची रेलचेल होऊन
महाराष्ट्रातील सर्व कोळीवाड्यांत भरभराट होवो, या सदिच्छांसह
🥥🌺✨ नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 🥥🌺✨

कोकण म्हणजे निळी खाडी,
कोकण म्हणजे माडाची झाडी
कोकण म्हणजे सागराची गाज,
कोकण म्हणजे रूपेरी वाळुचा साज
🥥🌺✨ नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 🥥🌺✨

दर्यासागर हाय आमचा राजा,
त्याचे जीवावर आम्ही करताव मजा
नारले पुनवेला नारळ सोनीयाचा,
सगले मीलून मान देताव दरियाचा
🥥🌺✨ नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 🥥🌺✨

दर्यावरी आमचे डोल होरी
घेऊन माशांच्या डोली
नं आम्ही हावं जातीचे कोळी..
सर्व कोळी बांधवांना
🥥🌺✨ नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 🥥🌺✨

नारळी पौर्णिमेनिमित्त
सागराला श्रीफळ अर्पण करताना
सर्व कोळी बांधवांच्या
समृद्ध जीवनाचा संकल्प करूया..
समस्त कोळी बांधवाना आणि संपूर्ण महाराष्टाला 
🥥🌺✨ नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. 🥥🌺✨

नारळी पौर्णिमेच्या दिनी समुद्राला येते भरती,
दर्याराजाला शांत हो अशी कोळीबांधव प्रार्थना करती..
आज असतो सगळ्यांकडे नैवेद्याला नारळीभात,
सागराला सोन्याचा नारळ वाहून मासेमारीला होते सुरुवात..
🥥🌺✨ नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 🥥🌺✨

सन आयलाय गो, आयलाय गो
नारली पुनवेचा..
मनी आनंद मावना,
कोळ्यांच्या दुनियेचा..
🥥🌺✨ नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 🥥🌺✨

दर्याचे धन तुझ्या होरीला येऊ दे..
माझ्या कोळीबांधवांना सुखाचे दिस येऊ दे..
🥥🌺✨ नारळी पौर्णिमेच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा 🥥🌺✨

कोळीवारा सारा सजलाय गो,
कोळी यो नाखवा आयलाय गो…
मासळीचा दुष्काळ सरू दे,
दर्याचे धन तुझ्या होरीला येऊ दे..
सर्व बांधवांना 🥥🌺✨ नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 🥥🌺✨