नवसाला पावणारा कोळंबा देव! नांदगावची प्रसिद्ध जत्रा 3 मे रोजी; ‘मटण-भाकरी’च्या प्रसादासाठी भक्तांची होणार गर्दी

WhatsApp Group

कणकवली (नांदगाव): भक्तांच्या हाकेला धावणारा आणि नवसाला पावणारा देव म्हणून महाराष्ट्रसह गोवा आणि कर्नाटक राज्यात ख्याती असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नांदगाव येथील श्री देव कोळंबा (Kolamba Dev Nandgaon Jatra 3 May 2026) या जागृत देवस्थानची वार्षिक जत्रा यंदा रविवार, ३ मे २०२६ रोजी मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे. या जत्रेसाठी मुंबई-पुण्यासह परराज्यातूनही लाखो भाविक उपस्थित राहतात, जत्रेसाठी ग्रामस्थांकडून जय्यत तयारी केली जाते.

चिकन, मटण-भाकरीच्या प्रसादाचे खास आकर्षण

नांदगावच्या श्री देव कोळंबा जत्रेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथे दिला जाणारा चिकन, मटण-भाकरीचा महाप्रसाद. चिकन,  मटण आणि भाकरीचा प्रसाद हा हजारो भाविकांना वाटला जातो. ही परंपरा अनेक वर्षांपासून जपली जात असून, कोकणातील एका वेगळ्या संस्कृतीचे दर्शन यातून घडते. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गालगत नांदगाव तिठा परिसरातील श्री देव कोळंबा हे एक जागृत व नवसाला पावणारे देवस्थान म्हणून सर्वदूर परिचीत आहे.

समीर आमुणेकर