नाना पटोलेंचं नवं Tweet..! व्हिडिओ शेअर करत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर साधला निशाणा

WhatsApp Group

मुंबई – नाना पटोले Nana Patole यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी Prime Minister Narendra Modi यांच्यावर पुन्हा एकदा टीका केली आहे. ट्विट करुन त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी असे म्हटले आहे. नाना पटोले यांनी व्हिडिओ पोस्ट करुन हे ट्विट केले आहे.

नाना पटोले यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे की, आज उत्तर प्रदेशामधील जनता मतदान करणार आहे. महाराष्ट्राचे आणि उत्तर प्रदेशाचे नाते हे आई आणि मावशीचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपने उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्राचा नात्याचा अपमान केला आहे. हा अपमान लक्षात ठेवावा. जय महाराष्ट्र, जय उत्तर प्रदेश. असं नाना पटोले यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.