भंडारा – काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. नाना पटोले यांचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर जोरदार व्हायरल होत असून या व्हिडीओत ते भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारण्याची आणि शिव्या देण्याची भाषा करत आहेत.
भंडारा जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक प्रचारसभेदरम्यान आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना नाना पटोले व्हिडीओमध्ये बोलताना दिसत आहेत की, ‘मी मोदीला मारु शकतो आणि त्याला शिव्याही देऊ शकतो.’ त्यांच्या या व्हायरल व्हिडीओनंतर त्यांच्यावर सर्वच स्तरातून टीका होत आहे. देशाच्या पंतप्रधानांबाबत हे असे शब्द वापरणे चुकिचं असल्याचं अनेक लोक म्हणत आहेत.
एका राष्ट्रीय पक्षाचा प्रदेशाध्यक्ष देशाच्या पंतप्रधानांना मारण्याची भाषा करतो, हे अतिशय निंदनीय आहे. अतिशय खालच्या दर्जाचे राजकारण आहे. पोलिसांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर ताबडतोब कारवाई करून त्यांच्यावर गुन्हा नोंदवावा. अशी मागणी भाजपचे स्थानीक आमदार परिणय फुके यांनी केली आहे.