2014-2019 या काळात लाखो रुपयांची उधळपट्टी फडणवीसांनी केली; नाना पटोले यांचा हल्लाबोल

WhatsApp Group

आज महाराष्ट्र कॉंग्रेसकडून (Congress) पत्रकार परिषद (Press Conference) घेण्यात आली. या पत्रकार परिषदेस कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole), बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat), अशोकराव चव्हाण (Ashokrao Chavan), नितीन राऊत (Nitin Raut), वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad), विजय वडेट्टीवारसह आदींनी हजेरी लावली.

दरम्यान नाना पटोले यावेळी अॅक्शन मोडमध्ये दिसुन आले. ते म्हणाले, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) राज्याचे मुख्यमंत्री असताना लाखो रुपयांची उधळपट्टी केली गेली असा घणाघात कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी  भाजपवर केला आहे. तसेच 9 ते 15 ऑगस्ट दरम्यान जिल्ह्या-जिल्ह्यात पदयात्रा काढून कॉंग्रेस जनजागृती करणार असल्याची माहितीही नाना पटोले यांनी दिली.