“तुझ्या सारखा कलावंत आणि माणूस होणे नाही….” नाना पाटेकर यांची विक्रम गोखलेंच्या निधनानंतर भावूक पोस्ट

हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे काल निधन झाले. त्यांना 5 नोव्हेंबरपासून पुण्यातील पंडित दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या शरीरातील अनेक भागांनी काम करणे बंद केले होते, त्यानंतर त्यांना आयसीयूमध्ये व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. विक्रम गोखले यांच्या निधनाचे वृत्त समजताच हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे.
राजकीय नेत्यांपासून ते चित्रपटसृष्टीतील सर्वच मोठ्या कलाकारांपर्यंत विक्रम गोखलेंच्या निधनाने शोक व्यक्त केला जात आहे. अभिनेते नाना पाटेकर यांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून भावूक पोस्ट करत विक्रम गोखले यांना आदरांजली वाहिली आहे.