VIRAL: व्हायरल व्हिडिओचा ‘क्लायमॅक्स’! रॅपिड ट्रेनमधील ‘त्या’ अश्लिल कृत्य करणाऱ्या जोडप्याचा साखरपुडा संपन्न, लग्न कधी?
‘नमो भारत’ अर्थात रॅपिड रेलमध्ये आक्षेपार्ह कृत्य केल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले ते तरुण-तरुणी आता लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. गेल्या महिन्यात या दोघांचे रेल्वेतील सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते, ज्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली होती. मात्र, आता या प्रकरणाला एक नवी कलाटणी मिळाली असून, सामाजिक बदनामी टाळण्यासाठी दोन्ही कुटुंबीयांनी या विद्यार्थी जोडप्याचा साखरपुडा उरकला आहे.
तीन मिनिटांच्या व्हिडिओने उडवली होती खळबळ
२० डिसेंबर रोजी सोशल मीडियावर नमो भारत ट्रेनमधील एक ते तीन मिनिटांचे सुमारे चार व्हिडिओ व्हायरल झाले होते. हे व्हिडिओ २४ नोव्हेंबरच्या संध्याकाळचे असून गाझियाबादहून मेरठकडे जाणाऱ्या ट्रेनमधील सीसीटीव्ही फुटेज असल्याचे तपासात समोर आले होते. या व्हिडिओमध्ये एक तरुण आणि तरुणी अत्यंत आक्षेपार्ह स्थितीत पाहायला मिळाले होते. सार्वजनिक वाहतुकीमध्ये अशा प्रकारचे वर्तन केल्यामुळे या जोडीवर प्रचंड टीका झाली होती आणि हे प्रकरण राष्ट्रीय स्तरावर चर्चेत आले होते.
उच्चशिक्षित विद्यार्थी आणि सामाजिक बहिष्कार
या प्रकरणातील तरुण आणि तरुणीची ओळख पटली असून, दोघेही मोदीनगर परिसरातील रहिवासी आहेत. मुलगा बीटेक (B.Tech) करत असून मुलगी बीएसए (BSA) चे शिक्षण घेत आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दोन्ही कुटुंबीयांना समाजात प्रचंड मानहानी सहन करावी लागली होती. परिस्थिती इतकी बिकट झाली होती की, बदनामीच्या भीतीने हे दोन्ही परिवार पूर्णपणे एकाकी पडले होते. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून दोन्ही मुलांच्या पालकांनी एकत्र येऊन चर्चा केली आणि या नात्याला कायदेशीर स्वरूप देण्याचे ठरवले.
लग्नाचा मुहूर्त ठरला; पोलिसांना माहिती नाही
दोन्ही कुटुंबीयांच्या जवळच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुण-तरुणी एकाच जातीचे असल्याने लग्नात कोणतीही अडचण आली नाही. सध्या त्यांचा साखरपुडा पार पडला असून, लग्नाचा मुहूर्त निघताच ते विवाहबंधनात अडकतील. हा विवाह सोहळा अत्यंत खाजगी स्वरूपाचा असेल, ज्यामध्ये केवळ जवळचे नातेवाईकच उपस्थित राहतील. दरम्यान, मोदीनगरचे एसीपी अमित सक्सेना यांनी सांगितले की, अशा कोणत्याही साखरपुड्याची किंवा लग्नाची अधिकृत माहिती अद्याप पोलिसांना मिळालेली नाही.
