निवडणूक आयोगाची मोठी घोषणा – आता वयाच्या 17 व्या वर्षी तुम्ही मतदार ओळखपत्रासाठी अर्ज करू शकता

WhatsApp Group

देशातील तरुण मतदारांसाठी एक मोठी बातमी आहे. आता मतदार ओळखपत्र मिळवण्यासाठी 18 वर्षे वयाची गरज नसून, वयाच्या 17 व्या वर्षी तुम्ही मतदार ओळखपत्रासाठी अर्ज करू शकाल. मात्र मतदार यादीवर नाव आले म्हणून सदर व्यक्तीस मतदान करता येणार नाही. मतदानासाठी मात्र त्याला 18 वर्षे पूर्ण होणेच बंधनकारण असणार आहे. भारतीय निवडणूक आयोगाने नव्या नियमाद्वारे नागरिकांना ही संधी उपलब्ध करुन दिली आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि निवडणूक आयुक्त अनुप चंद्र पांडे यांच्या नेतृत्वाखालील भारतीय निवडणूक आयोगाने देशभरातील सर्व राज्यांचे मुख्य निवडणूक अधिकारी, निवडणूक नोंदणी अधिकारी, सहायक निवडणूक नोंदणी अधिकारी यांना दिलेल्या निर्देशानुसार नव्या सूचनेनुसार मतदारांची नोंदणी पार पडणार आहे. नव्या नियमानुसार मतदार यादीत नावनोंदणी करण्यासाठी वय वर्षे 17 पूर्ण असलेल्या तरुणांनी आपापले नाव नोंदणी अर्ज एक एप्रिल, एक जुलै आणि एक ऑक्टोबर या पात्रता तारखांच्या कालावधीमध्ये पोहोचवावे अथवा दाखल करावेत असं आयोगाने म्हटले आहे.

मुख्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केल्यानुसार देशभरातील मतदार याद्या आता दर तिन महिन्यांनी अद्ययावत केल्या जाणार आहेत. त्यामुळे मतदानासाठी पात्र होण्यासाठी वयोमर्यादा प्राप्त केलेल्या तरुण तरुणांना नावनोंदणी शक्य होणार आहे.