नागपूर – महापालिकेच्या Nagpur Municipal Corporation ऑनलाइन सभेतील एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. नागपूर महापालिकेच्या ऑनलाइन सभेदरम्यान विरोधी पक्षनेते तानाजी वनवे बोलत असतानाच त्याच्याच पक्षाचे नगरसेवक रमेश पुणेकर हे सिगारेट ओढत होते Ramesh Punekar smoking cigarette in online meeting.
ऑनलाइन सभेत सिगारेट ओढतानाचे रमेश पुणेकर यांचे फोटो पूर्ण नागपूरात काही तासांमध्येच व्हायरल झाले असून अनेकांनी या काँग्रेस नगरसेवकावर टीकेची झोड उठवली आहे.
नागपूर महापालिकेच्या ऑनलाइन सभेत काँग्रेस नगरसेवक रमेश पुणेकर ओढत होते सिगारेट. pic.twitter.com/Tp4GSwf5GJ
— Inside Marathi (@InsideMarathi) January 30, 2022
नागपूर महापालिकेच्या या ऑनलाइन या बैठकीत महापौर, महापालिका आयुक्त आणि नगरसेवक उपस्थित होते. त्यामुळे या असभ्य वर्तवणूक करणाऱ्या काँग्रेस नगरसेवकावर कारवाई होणार का नाही हे पाहणे हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.