मुंब्रा – दिव्यातील नागवाडी परिसरामध्ये राहत असलेल्या दशरथ काकडे याने त्याच्या घराजवळ थुंकणाऱ्या रुपेश गोळे या १३ वर्षांच्या मुलाचा राग आल्यामुळे त्याने त्याचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सखोल चौकशीनंतर पोलिसांनी त्या आरोपीला अटक केली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी आरोपी दशरथ काकडे याने रुपेशच्या आईला खोटे सांगून त्याला परिसरामधील बंद असलेल्या ठामपाच्या पहिल्या मजल्यावरील शौचालयात नेले. तेथे गळा दाबून त्याचा खून केला. मयत मुलाचे वडील विजय यांनी याबाबत दाखल केलेल्या तक्रारीवरून काकडे याला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.