
मुंबई – मुंबईकरांसाठी खूपच महत्वाची बातमी आहे. मुंबईकरांनी पुढचे दोन दिवस पाणी जपून वापरावे (water sparingly ) कारण येत्या 31मे आणि 1 जून दरम्यान मुंबईत पाणीकपात (Water Cut Off) करण्यात येणार आहे. या दोन दिवसांच्या कालावधीमध्ये बीएमसीकडून (BMC) 24 तास पाणीकपात जाहीर करण्यात आली आहे. या काळात मुंबईतील बहुतांश भागात पाणीपुरवठा केला जाणार नाही. त्यामुळे मुंबईकरांनी पाण्याचा जपून वापर करावा असं आवाहन केले जात आहे.
बीएमसीच्या अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 31 मे रोजी सकाळी 8.30 वाजल्यापासून मुंबईत 24 तास पाणीकपात केली जाणार आहे. पाण्याच्या मुख्य भागावर सुरू असलेल्या देखभाल आणि दुरुस्तीचे काम पाहता संसाधनात कपात करण्यात येणार आहे. या काळात कांदिवली, बोरिवली, दहिसर आणि मालाड या दाट लोकवस्तीच्या भागाला पाणीकपातीचा फटका बसणार आहे.