मुंबई हादरली, प्लास्टिकच्या पिशवीत सापडला दोन वर्षांच्या चिमुरड्याचा मृतदेह

WhatsApp Group

मुंबईः माहीम परिसरामध्ये बुधवारी सकाळी प्लास्टिकच्या पिशवीमध्ये एका दोन वर्षांच्या मुलाचा मृतदेह सापडल्याची घटना समोर आली आहे. त्यानंतर तात्काळ पोलिसांना याबाबतची माहिती कळवण्यात आली. याप्रकरणी शाहू नगर पोलीस ठाण्यामध्ये अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मुलाच्या तोंडातून फेस येत होता. तसेच त्याचे डोके व उजवे मनगट उंदरांनी कुरतडले होते. असं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.