सिंधुदुर्ग – सिंधुदुर्गातील चिपी विमानतळ सुरू होऊन जेमतेम महिना झाला असेल. मात्र आता मुंबई ते सिंधुदुर्ग प्रवास (Mumbai-sindhudurg air travel) करणाऱ्यांना चांगलेच पैसे मोजावे लागणार आहेत. महिन्याभरात तब्बल 3 ते 4 पटीने तिकिटाचा दर वाढला आहे. एक महिन्यापूर्वी सिंधुदुर्ग ते मुंबई प्रवासाची तिकिट 2500 रुपये होती, मात्र आता त्याच विमानातून मुंबईला जाण्यासाठी तब्बल 9500 ते 12000 रुपये मोजावे लागणार आहेत (Mumbai-Sindhudurg air fares increased). दर वाढल्याने सामान्य चाकरमानी मात्र चिंतेत पडला आहे.
कोकणवासीयांनी विमानतळाचं स्वप्न पाहिलं होतं आणि 9 ऑक्टोबरला ते सत्यात उतरलं. केंद्रीय विमान वाहतूक उड्डानमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत चिपी विमानतळाच उद्घाटन पार पडलं. विमानतळ सुरू होऊन जेमतेम महिना झाला असतानाच तिकिटचे दर चार पटीने वाढले आहेत. त्यामुळे कोकणवासीयांमध्ये मोठी निराशा पसरली आहे.
चिपी विमानतळामुळे विमानातून प्रवास करायच असं प्रत्येक कोकणी माणसाचं स्वप्न होतं. अडीच-तीन हजार खर्च करून आपण कोंकणात जाऊ शकतो, असं चाकरमानी सांगत होते. मात्र आता अडीज-तीन हजार रुपयांच्या जागी नऊ ते बारा हजार रुपये मोजावे लागणार आहेत. चाकरमान्यांच्या वाढत्या मागणीमुळे तिकीटाचे दर वाढवण्यात आले आहेत.
चिपी विमानतळाची (chipi airport) सेवा 9 ऑक्टोबरपासून सुरू झाली. विमानसेवा सूरु होऊन जवळ जवळ महिना झाला असेल. पण महिन्याभरात चाकरमन्यांकडून विमानसेवेला चांगला प्रतिसाद भेटला. गेल्या महिनाभरात तिकिट मिळणे मुश्किल झालं होतं, त्यात दसरा, दिवाळीच्या तिकीटांचं बुकिंग अगोदरच झालं होतं. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता तिकिट दरात वाढ करण्यात आली आहे. या तिकीट दरामुळे सामान्य कोकणवासी मात्र सरकारवर खूप नाराज झाला आहे